वसई - करोना विषाणू हा चिकनमधून पसरतो, अशी माहिती सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. मात्र चिकन खाल्ल्याने करोना होत नाही, असा संदेश देत चक्क क्रिकेट सामना विजेत्यांना कोंबड्या आणि कोंबडे बक्षीस देण्यात आले आहे.
करोना विषाणूने सध्या जगभरात धुमाकूळ घातला असून भारतात तो पसरला आहे. हा रोग भयानक जीवघेणा असून त्याची लागण शहरात झाल्यास झपाट्याने तो पसरण्याची शक्यता आहे. मात्र हा करोना चिकन खाल्ल्याने पसरतो, अशी अफवा सध्या सर्वत्र आहे. मात्र नागरिकांचा हा संभ्रम दूर करण्यासाठी आगाशी येथील पुरापाडा गावात जनजागृती करण्यात आली आहे. होळी व धुलीवंदन सणाचे औचित्य साधून आगरी समाज पुरापाडा ग्रामस्थांनी क्रिकेट सामने भरविले होते. सध्या करोनामुळे कोंबड्यांचा व्यवसाय डबघाईला आल्याने यासाठी सामन्यात प्रथम विजयी संघाला चक्क ११ कोंबडे तर दुसऱ्या ११ कोंबड्यांचे बक्षीस देण्यात आले आहे. NPR