मुंबईतील सायबर गुन्हेगारीचा आलेख चढता


 मुंबई- भूलथापा देऊन बँक ग्राहकांचे तपशील मिळवून परस्पर पैसे हडपणे, विवाहजुळणी संकेतस्थळांवर खोटे तपशील देऊन तरुणींची फसवणूक करणे, ऑनलाइन खरेदी-विक्री गंडा अशा प्रकारांबाबत सरकारी यंत्रणा तसच पोलिसांकडून वारंवार जनजागृती करूनही मुंबईतील सायबर गुन्हेगारीला आळा घालणे शक्य झालेले नाही. शहरात सायबर गुन्हट्यांचा आलेख वाढला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी दुप्पट गुन्हे नोंद होतील, असा अंदाज आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने(एनसीआरबी) २०१७ वर्षांत देशभर घडलेल्या विविध प्रकारच्या गुन्हट्यांचा अहवाल सादर केला. या अहवालानुसार २०१७ मध्ये सवाधिक सायबर गुन्हट्यांची नोंद बंगळरु येथे(२७४३) झाली होती. त्याखालोखाल मुंबईत १३६२ गुन्हे घडले होते. प्रत्यक्षात एनसीआरबीच्या अहवालानुसार दर एक लाख लोकसंख्येमागील गुन्हयंचे प्रमाण पाहिल्यास सायबर गुन्हेगारीत बंगळूरु पहिल्या तर मुंबई पाचव्या क्रमांकावर होते.


एनसीआरबीने देशातील १९ महानगरांमधील गुन्हे, गुन्ह्यांचे प्रमाण आदी तपशील या अहवालात दिले आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत या १९ महानगरांमधील सायबर गुन्हेगारीचे सरासरी प्रमाण ६.४ आहे. मुंबईत हे प्रमाण ७.४ भरते. तर बंगळुरुत ३२.३, जयपुरमध्ये २२.७, लखनऊत २१.० आणि कानपूरमध्ये ७.८ इतके नोंद झाले.


मुंबईचा विचार करता २०१७ मध्ये १३६२ गुन्हे नोंद झाले. २०१८मध्ये गुन्ह्यांची संख्या तेवढीच राहिली. तर या वर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत १६८६ गुन्हे नोंद झाले. राज्याच्या सायबर विभागानुसार नायजेरियन भामटट्यांकडून आमीष दाखवून फसवणुकीचे, बनावट क्रेडिट-डेबिट कार्ड घोटाळे आटोक्यात असले तरी ऑनलाइन भामटट्यांनी मात्र धुमाकूळ घातला आहे. सायबर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार नोकरीचे आमीष, ओटीपी मिळवून गंडा आणि विवाहजुळणी संकेतस्थळाद्वारे ओळख वाढवून फसवणूक या प्रकारांमध्ये मोठट्या प्रमाणात वाढ झाली आहे.