कोल्हापूर- कोल्हापूर पोलिसांच्या विशेष पथकाने एका फार्महाऊसवर सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा भंडाफोड केला आहे. पन्हाळा तालुक्यातील दानेवाडी येथील आर.जे. फार्महाऊसवर छापा टाकून देहविक्रीसाठी आणलेल्या चार तरुणी व दोन एजेंटला पोलिसांनी अटक केली आहे. पन्हाळा, ज्योतिबाच्या पायथ्याशी असणाऱ्या दानेवाडी येथील आर.जे. फार्महाऊसवर वेश्या व्यवसायासाठी तरुणी पुरवल्या जात असल्याची माहिती कोल्हापूरच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या (पिटा) पोलिसांच्या विशेष पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून बनावट ग्राहक पाठवून फार्महाऊसवर छापा टाकला. यावेळा काही तरुणी आक्षेपाह अवस्थेत आढळून आल्या. पोलिसांनी फार्महाऊसचा मालक महेश श्रीकांत कदम आणि गणेश बाबासाहेब जगदाळे या दोघांसह चार तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. टाटा सुमो, मोटारसायकल, दोन मोबाइल अस दोन लाख रूपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
सेक्स रॅकेटचा भंडाफोड, फार्महाऊसवर आक्षेपार्ह अवस्थेत आढळल्या तरुणी