भाईंदर, मीरा-भाईंदर महानगरपालिकेतील बाऊन्सर हप्तेवसुली करत असल्याचे प्रकरण ताजे असतानाच मुख्यालयामध्ये राजकीय पदाधिकाऱ्यांचे खिसे कापणारी टोळी घुसली असल्याचे उघडकीस आले आहे. महापौर आणि उपमहापौर निवडणुकीनंतर चोरट्यांनी थेट पालिका मुख्यालयात घुसून भाजपच्याच पदाधिकाऱ्यांचे खिसे कापून लाखापेक्षा जास्त रुपये लुटले आहेत. . मीरा-भाईंदर महानगरपालिका मुख्यालयात | बुधवारी दुपारी महापौर आणि | उपमहापौरपदासाठी निवडणूक पार पडली. या . 'निवडणुकीनंतर पालिका सभागृहातून भाजपचे सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि पदाधिकारी जल्लोष करत बाहेर पडले. यावेळी गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे, नगरसेवक सचिन म्हात्रे आणि नगरसेविका । . दीपिका अरोरा यांचे पती पंकज यांचे पाकीट मारले. यातील जिल्हाध्यक्षांच्या खिशात ७० हजार, अरोरा यांच्या पाकिटातील २५ हजार आणि म्हात्रे यांच्या खिशातील २५ हजार रुपये चोरण्यात आले. यासंदर्भात भाईंदर पोलिसांत तक्रार दाखल झाली असून पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान कडेकोट पोलीस बंदोबस्त असतानाही चोरट्यांनी लाखो रुपये लुटल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.