नवघर पोलीस ठाण्याच्या हद् दीतील गोल्डन नेस्ट येथे एका रो हाऊसमध्ये १४ डिसेंबर २०१९ रोजी दिवसाढवळया अज्ञात चोरटयांनी दरवाजा तोडून रोख रक्कम व दागिन्यांसह अंदाजे एकूण १५ लाखांचा मुद्देमाल सराईतपणे लंपास केला. अतिशय जलद गतीने भाईंदर नवघर पोलीसांनी या घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांना दिल्ली येथून अटक केली. पोलीस सतत १५ दिवस गुन्हेगारांना पकडण्यासाठी दिल्ली येथे ठाण मांडून राहीले व या घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांना पोलीसांनी पकडले. सुरवातीस नकार देणाऱ्या या गुन्हेगारांना पोलीस खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हयाची क्बूली दिली व यातूनच त्यांनी महाराष्ट्र, हरियाणा व अशा अनेक राज्यांत चोरी केल्याची माहिती दिली. सदरची कामगिरी मा. श्री. शिवाजी राठोड, पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण, मा. श्री. संजय पाटील, अपर पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण , डॉ. शशीकांत भोसले, उप विभा.पो.अधि. भाईंदर विभाग, व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, प्रकाश बिराजदार, पोलीस निरीक्षक(गुन्हे) , संपतराव पाटील, नवघर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शना खाली नवघर पोलीस ठाण्याचे सहा. पो. निरी. योगेश काळे, स.पो.उप निरी. बी. व्ही. राठोड , पो.ना. रविंद्र भालेराव, पोना.प्रशांत वाघ, पोशि. गिरगांवकर, पोशि.आकाश वाकडे, पोशि.नवनाथ माने, पोशि. निलेश शिंदे, पोशि.सुनिल ठाकुर व नवघर पोलीस ठाण्याचे विशेष तपास पथक यांनी केलेली असुन सदर गुन्हयांचा तपास सहा.पो.निरी.योगेश काळे हे करीत असुन , तपास चालू आहे.
परप्रांतातून येऊन घरफोड्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या भईंदर (पुर्व), नवघर रोड पोलिसांनी दिल्लीतून आवळल्या मुसक्या