दिनांक १२/०८/२०२० रोजी दुपारी १४.१५ वाजताचे सुमारास वाणगांव पोलीस ठाणे हद्दीतील बावडा बसस्टॅड शेडमध्ये गुप्त बातमीदाराकडुन बातमी मिळाली की एक इसम हा मटका जुगाराचे आकडे लावुन मटका चालवत असल्याची माहीती मिळाली असता सदर ठिकाणी छापा टाकुन आरोपी इसम नामे रामानंद शिवराम शेट्टी वय ५३ वर्ष रा.कापशी गहलापाडा ता.डहाणु जि.पालघर हा स्वत:च्या फायदया करीता राोख रक्कम स्विकारुन मटका जुगाराची साधने त्याचे कब्जात बाळगुन मटका जुगाराचे आकडे लावुन मटका जुगार घेत असताना मिळून आला. आरोपी याचे ताब्यातुन १८४०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन आरोपी याचे विरुद्ध वाणगांव पोलीस ठाणे गु.र.नं. ५२/२०२० महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई ही श्री.विश्वास वळवी, उपविभागीय पोलीस अधिकारी, बोईसर यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, बोईसर नेमणुकीतील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली आहे.
उपविभागिय पोलीस अधिकारी, बोईसर यांचेकडुन वाणगांव पोलीस ठाणे हद्दीत आकडे लावुन मटका जुगार खेळणा-या आरोपीवर कारवाई