दिनांक १२/०८/२०२० रोजी १२.३० वा चे सुमारास केळवा पोलीस ठाणे हद्दीतील चिखलपाडा ता. जि. पालघर येथे आरोपी १) विकांत दत्तु भोईर, वय-४०, २) किरण पांडुरंग पाटील, वय-३१ वर्षे, ३) मनोज गोविनाथ पाटील, वय-३१ वर्षे, ४) कांचन दिलीप पाटील, वय-२५ वर्षे, ५) सागर बाळकृष्ण भोईर, वय-३० वर्षे, सर्व रा.चिखलपाडा पो.टेंभिखोडावे, ता.जि.पालघर यांनी मनाई आदेशाचे उल्लंघन करुन जिवीतास धोकादायक असलेल्या रोगाचा संसर्ग पसरविण्याचा संभव असलेली हयगयीची कृती करुन तीन पत्ती नावाचा जुगार खेळत व खेळवित असतांना मिळुन आले. आरोपी यांचे ताब्यातुन १९,९३०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन आरोपीत यांचे विरुद्ध केळवा पोलीस ठाणे गु.र.नं. ३८/२०२० भा.दं.वि.सं.कलम २६९, १८८ सह आ.व्य.अधि.२००५ चे कलम ५१(ब) सह सा.रो.क. ३ सह महा.जुगार प्रति.कायदा १८८७ चे कलम १२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील आरोपी यांना दिनांक १२/०८/२०२० रोजी अटक करुन जामीनावर मुक्त करण्यात आले आहे. सदरची कारवाई ही सहायक पोलीस निरीक्षक श्री.मानसिंग पाटील, केळवा पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली केळवा पोलीस ठाणेचे अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली आहे.
केळवा पोलीस ठाणे यांचेकडून जुगार खेळणा-या ५ आरोपीवर कारवाई