मुंबईत शातंता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी येत्या ९ मार्चपर्यंत जमावबंदीचे (Section 144 _Imposed In Mumbai) आदेश जारी करण्यात आले आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील अधिकारानुसार पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी बृहन्मुंबई हद्दीत ९ मार्च २०२० पर्यंत जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार, पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव करणे (Section 144 Imposed In Mumbai), मोर्चा काढणे, जमाव करुन ध्वनीवर्धकाचा, सांगितीय बँड, फटाके फोडणे यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. विवाह समारंभ आणि विवाहप्रथेशी संबंधित अन्य समारंभ, अत्यविधी कार्यक्रम, कंपन्या, सहकारी संस्था आणि अन्य संस्था व संघटनांच्या वैधानिक बैठका, कुबमध्ये होणारे कार्यक्रम, सहकारी संस्था तसेच अन्य संस्थांच्या नियमित कामकाजाचा भाग म्हणून होणारे कार्यक्रम यांना या बंदी आदेशातून वगळण्यात आले आहे.
चित्रपटगृहे, नाट्यगृहे तसेच सार्वजनिक मनोरंजनाची अन्य ठिकाणे, न्यायालये, शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच अन्य शैक्षणिक संस्था, कंपन्या, कारखाने, दुकाने तसेच अन्य आस्थापनांमध्ये नियमित व्यापार, व्यवसाय या कारणांनी होणाला जमावास यातून वगळण्यात आले आहे. तसेच, जमाव करण्यास तसेच शांततापूर्ण मार्गाने मोर्चास पोलीसांनी परवानगी दिलेली असल्यास त्यासही या जमावबंदीतून (Section 144 Imposed In Mumbai) वगळण्यात आले आहे.