भिवंडी : परदेशातून आलेल्या भंगारातील मास्क धुवून (Bhiwandi Mask Reuse Issue) वापरात आणण्याचा प्रकार उघड झाला होता. त्यानंतर या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून रविवारी रात्री उशिरा भंगारातील मास्क नष्ट करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून या कारवाई आदेश देण्यात आले.
वळ ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक अमोल कदम (पैग ले घ्ल) यांच्या तक्रारीनंतर रविवारी रात्री दहा वाजता कलम २६९ नुसार इम्रान शेखविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
__सध्या जगभर कोरोना विषाणूने थैमान घातले असताना भारतात त्याचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणावर मास्कची मागणी वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर भिवंडी तालुक्यातील गोदाम पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर परदेशातून भंगार येत असून त्यामध्ये वापरलेले मास्कसुध्दा मोठ्या प्रमाणावर आहेत.
सध्या बाजारात मास्कचा तुटवडा असल्याने परदेशातून भंगारात आणलेले वापरलेले मास्क येथील गोदामात धुवून पुन्हा विक्रीसाठी आणण्याचा घाट गोदाम मालकाचा होता. मात्र, असं करत असतानाचा एक व्हिडीओ शनिवारी व्हायरल झाला. त्यानंतर पोलीस आणि आरोग्य विभाग यंत्रणा खडबडून जागी झाली.