तलासरी पोलीस ठाण्याकडून गुटखा वाहतूक करणाया आरोपांना अटक


दिनांक ०६/०३/२०२० रोजी २१.३० वा च्या सुमारास तलासरी पोलीस ठाणे हद्दीत मौजे आर. टी. ओ. चेकपोस्ट दापचरी येथे ता. तलासरी, जि. पालघर येथे तौफिक ताहीर हसन (३५), मुजीब अब्दुल अहमद (३८), मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर कार नंबर एम. एच. ०५, बी. जे. १४७३ चा मालक यांनी आपसात संगनमत करून त्यांच्या ताब्यातील कारमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला अन्न पदार्थाचा विमल पान मसाला, व्ही-१ तंबाखू हा मानवी आरोग्यास व जिवीतास हानिकारक आहे हे माहित असताना सुद्धा वाहतूक करत असल्याचे आढळून आले. सदर आरोपींच्या मारुती ताब्यातून सुझुकी स्विफ्ट डिझायर कारसह तंबाखू, गुटखा व पान पानमसाल्यानी भरलेल्या अशा एकूण ९ सफेद रंगाच्या ७,४२,२००/- रुपये किमतीच्या गोण्या हस्तगत करण्यात आल्या असून आरोपींवर तलासरी पोलीस ठाण्यात गु.रजि.क्र. ५४/२०२० भा.द.वी.स.क. ३२८, १८८, २७२, २७३, ३४ सह अन्न सुरक्षा माणदे कायदा २००६ नियम व नियमने २०११ चे कलम २६(२), २७, २३, २६(२),(४), ३० (२) अ सह वाचन मा. अन्न सुरक्षा महाराष्ट्र राज्य अधिसूचना प्रमाणे गुन्हा दाखल केला असून सादर गुन्ह्यातील आरोपीना अटक करण्यात आले आहे.


सदरची कारवाई तलासरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली तलासरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.