सोशल राईटम फाउंडेशन संघटनेच्या वतीने 'मी एक विद्यार्थी, माझे सामर्थ्य किती या शिर्षकाद्वारे पनवेल शहरात विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित


पनवेल शहरात अनेकशाळांमध्ये शाळेच्या संचालकांच्या मदतीने ८वी व ९वी च्या विद्यार्थ्यांना 'मी एकविद्यार्थी, माझे सामर्थ्य किती?' हा मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.


या कार्यक्रमात अनेकनामवंत शिक्षकांनी दहावी साठी अभ्यासाची तयारी कशी करावी?, अभ्यास करण्याची पद्धत कशा प्रकारे असली पाहीजे याबाबत मार्गदर्शन केले. यासाठी सोशल राईट्स फाऊंडेशनचे संस्थापकदिपकमोरेश्वर नाईकयांच्या मार्गदर्शनाने पनवेल शहर अध्यक्ष राहुल लोहकरे यांनी विविध शाळेत हे कार्यक्रम आयोजित केले. सदर प्रसंगी संजय बाळकृष्ण शिंदे, संतोष तोतरे, रजनी लोहकरे आदी शिक्षकांनी मुलांना अगदी सोप्या भाषेत मार्गदर्शन केले . याकामी पनवेल शहर कमिटीच्या सर्व सदस्यांनी अथक मेहनत घेतली.