टाटा स्कायचा सेटटॉप बॉक्स महागला

नवी दिल्ली, दि. ५ (वृत्तसंस्था) - ट्रायने नॅशनल टारिफ ऑर्डर(एनटीओ) २.० लागू केल्यानंतर टाटा स्कायने एसडी आणि एचडी सेटटॉप बॉक्सच्या किमतीत वाढ करून ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. ___ एसडी आणि एचडी सेटटॉप बॉक्सची किंमत आधी १३९९ रुपये होती. त्यात १४९९ रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. टाटा स्काय एसडी मल्टी टीव्ही कनेक्शनची किंमत आता १३९९ रुपये झाली आहे. त्याचबरोबर एचडी मल्टी टीव्ही कनेक्शनची किंमत ९९९ रुपयांवरून ११९९ रुपयांपर्यंत वाढवली आहे.