८ मार्च २०२० , जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्या निमित्ताने आश्रय ट्र स्टचे संस्थापक दिपक मोरेश्वर नाईक यांच्या वतीने बोरीवली कॉसमस हाईस्कुल पटांगण, सावरपाडा, नॅन्सी कॉलनी येथे महिलांसाठी मोफत आरोग्य शिबीर व शस्त्रक्रिया घेण्यात आले. राजु माने मित्रमंडळ चे संस्थापक राजु माने यांनी या शिबीराचे आयोजन केले होते. अतिभव्य प्रमाणात या शिबीराचे स्वरुप होते. यामध्ये महिलांच्या आरोग्यविषयक तपासणी रक्तातील २८ प्रकारच्या चाचण्या, डोळे तपासणी , व १०० रुपयांमध्ये चष्मा वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे अस्थमा, कॅन्सर ची तपासणी करण्यात आली. या आरोग्य शिबीरासाठी मेघा चाफेकर यांचे विशेष सहकार्य लाभले.प्रसिद्धीप्रमुख अक्षय राणे यांनी विशेष सहकार्य लाभले.प्रसिद्धीप्रमुख अक्षय राणे संपुर्ण परिसरात मोठया प्रमाणात जाहिरात करुन महिलांना शिबीराचा लाभ घेण्यास मदत केली. मंडळाचे अध्यक्ष विनोद जुजुम, सचिव गणेश वरसाळे खजिनदार भुषण वरसाळे व राजु माने मित्रमंडळाचे सर्व सदस्य यांनी शिबीरासाठी येणाऱ्या महिलांची उत्तम सोय केली होती. सदरच्या शिबीरात जवळजवळ ५०० महिलांनी आपली तपासणी करुन घेतली. त्याचप्रमाणे ५ महिलांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया आश्रय ट्रस्टच्या वतीने सोमवारी करण्यात येणार आहे. या शिबीरासाठी स्पेक्टम लॅब , संस्कार सेवा संस्था व अपेक्स हॉस्पीटलच्या तज्ञ डॉक्टरांनी मोठया प्रमाणात सहकार्य केले.या शिबीरात बोरीवलीचे कार्यसम्राट आमदार प्रविण दरेकर यांनी प्रत्यक्ष वेळात वेळ काढून येऊन आश्रय ट्रस्ट तसेच विविध क्षेत्रामध्ये मोठया प्रमाणात कार्य करणाऱ्या असंख्य महिलांचे सत्कार केले. ठाणे ग्रामीणचे वाहतुकविभागाचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक अनिल पवार यांनी या शिबीरासाठी विशेष सहकार्य केले यावेळी आश्रय ट्र स्टचे सचिव प्रिती नाईक, विनोद मेढे, प्राजक्ता नाईक, रविंद्र लाड , प्रविण सुर्वे , अनिल मेहता उपस्थित होते.