बिल गेटस् यांचा मायक्रोसॉफ्टचा राजीनामा . समाजसेवेसाठी संचालकपद सोडले


__सॅन फ्रेंन्सिस्को,  - मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेटस् (६४) यांनी कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. समाजसेवा करण्यासाठी त्यांनी संचालकपद सोडले असून यापुढे मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांच्याशी कंपनीचे सल्लागार म्हणून काम करण्याचा निर्णय बिल गेटस् यांनी जाहीर केला आहे.


बिल गेटस् २०१४ पासून मायक्रोसॉफ्टच्या संचालक पदावर कार्यरत होते. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी सांगितले, 'मायक्रोसॉफ्ट माझ्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. मात्र यापुढे बिल अॅण्ड मेलिंडा गेटस् फाऊंडेशनसाठी काम करणार आहे.'