मार्गदर्शन

वसई : शिवसेना पालघर जिल्हा नालासोपारा शहराच्या वतीने सहकारी गृहनिर्माण संस्थेसंदर्भात तज्ज्ञांच्या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर १५ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजता तुळींज येथील अॅपेक्स टॉवर सभागृहाच्या दुसऱ्या मजल्यावर होणार आहे. मानीव अभी हस्तांतरण, स्थावर मालमत्ता विकास आणि नियमन कायदा-२०१६, सहकारी पुनर्विकास या विषयांवर तज्ज्ञ वक्ते उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.