मुंबई - सोमवारी नवी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सरकारवर वचक ठेवण्यासाठी शेडो कॅबिनेटचं उद्घाटन केलं. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कॅबिनेटची घोषणा केली. यामध्ये मनसेच्या अनेक नेत्यांकडे कॅबिनेटमधील मंत्र्याच्या कामावर नजर ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली.
९ मार्च रोजी महाराष्ट्र नवनिर्मिण सेनेचा १४ वा वर्धापन दिवस होता. यानिमित्ताने राज ठाकरेंनी शेडो कॅबिनेटमध्ये मनसेच्या नेत्यांकडे महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर नजर ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्याकडे नगरविकास व पर्यटन खातं आहेत. त्यांच्यावर वॉच ठेवण्याची जबाबदारी राज ठाकरे यांचे सुपूत्र व आताच सक्रिय राजकाणात दाखल झालेले मनसेचे युवानेते अमित ठाकरे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी मनसेच्या या रॉडो कॅबिनेटमध्ये बाळा नांदगावकर, संदिप देशपांडे, अभिजित पानसे, नितीन सरदेसाई आणि अमेय खोपकर यांचा समावेश आहे. येत्या एप्रिल मध्ये नवी मुंबईत येत्या एप्रिल मध्ये नवी मुंबईत महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकीत उत्तम कामगिरी करून आपला भगवा झेंडा राज्यभर नेऊया असं आवाहन बाळ नांदगावकर यांनी यावेळी बोलताना केलं. राजसाहेबांची वाणी तलवारीसारखी चालत असते आणि त्या वाणीच्या आदेशानुसार महाराष्ट्र सैनिक देखील धारधार कामगिरी करूया असंही त्यांनी सांगितलं.