लहान मुलांमधील कॅन्सरमध्ये होतेय मोठ्या प्रमाणात वाढ

। मुंबईः मोठ्यांमधील | कॅन्सरचे निदान करण्यासाठी डॉ क्टरांकडे त्वरित धाव घेतली जाते. मात्र, लहान मुलांमधील कॅन्सरचे निदान उशिरा झाल्यामुळे त्यांना पुढील वैद्यकीय उपचार मिळण्यास उशीर होतो. टाटा कॅन्सर रुग्णालयाने देशात वेगेवगळ्या ठिकाणी सुरू केलेल्या उपचार केंद्रांमध्ये आतापर्यंत साडेतीन हजार लहान मुलांना उपचार दिले आहेत. गुवाहाटी, वाराणसी आणि विशाखापट्टणम या ठिकाणी लहान मुलांसाठी सुरू केलेल्या कॅन्सर उपचार केंद्रांमुळे मुंबईतल्या टाटा रुग्णालयावर वैद्यकीय उपचारांचा भार येणार नाही, या मुलांना त्याच ठिकाणी वैद्यकीय उपचार मिळणे शक्य होणार आहे. येत्या दोन वर्षात खारघर येथील केंद्राचाही झपाट्याने विस्तार करण्यात येणार आहे. देशाच्या विविध ठिकाणची केंद्रे सक्रिय झाली की त्यानंतर प्रत्येक वर्षी साडेपाच हजार लहान कॅन्सर झालेल्या मुलांना वैद्यकीय उपचार मिळू शकतील, असा विश्वास टाटा - रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला. लहान मुलांमध्ये ब्लड कॅन्सर आणि ब्रेन ट्युमरच्या प्रकारातील कॅन्सरचे प्रमाण वाढते आहे. ताप येणे, भूक न लागणे, उलट्या । होणे, डोकेदुखी, तीव्र थकवा ही लक्षणे तीन महिन्यांहून अधिक काळ दिसत राहिली तर त्यासाठी कॅन्सरच्या चाचण्या त्वरित करून घेणे गरजेचे आहे. शून्य ते १५ वर्षांपर्यंतच्या मुलांना कॅन्सर होऊ शकतो, हे अनेकदा मान्यच केले जात नाही. त्यामुळे मुलांमधील कॅन्सरचे निदान उशिरा होते. मुलांमधील कॅ न्सर हा मोठ्यांच्या तुलनेमध्ये जलद बरा होऊ शकतो, याकडे टाटा कॅ न्सर रुग्णालयाचे संचालक (ों केडेमिक्स) डॉ. श्रीपाद बनावली यांनी लक्ष वेधले. मुंबईच्या रुग्णालयांवर येणारा भार कमी करण्यासाठी आता टाटा रुग्णालयाने देशातील इतर शहरांमध्येही विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. वाराणसीमध्ये यावर्षी कॅन्सर असलेल्या पाचशे बालरुग्णांची नोंद झाली आहे, त्यांना यापूर्वी कोणत्याही प्रकारची वैद्यकीय उपचार मिळाले नव्हते. त्यामुळे प्रत्येक लहान मुलांना मुंबईपर्यंत आणण्याची गरज यापुढे लागणार नाही, मुंबई इतकेच प्रगत वैद्यकीय उपचार त्या-त्या ठिकाणी देण्यात येतील. 


इम्युनथेरपीचा प्रभावी वापर


कॅन्सर झाल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती कमी होते, त्यामुळे मुलांचा कॅन्सर बरा करण्याच्या टप्प्यांमध्ये मुलांमधील कुपोषण हे आव्हान आहे. लहान मुलांमधील कॅन्सरवर उपचार करताना रुग्णालयामध्ये आता इम्युनथेरपीचा वापर प्रभावीरित्या केला जात आहे. यामध्ये मुलांमध्ये कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात. लहान मुलांवर विविध प्रकारच्या औषधांचा वापर सातत्याने केला जात नाही. आता उपलब्ध असलेल्या औषधांच्या प्रभावी वापरामुळे कॅन्सरवर मात करणे शक्य झाले आहे. पहिल्या पाच वर्षांमध्ये कॅन्सर पुन्हा उद्भवला नाही तर मूल कॅन्सरमुक्त झाल्याचे वैद्यकीय निदान करण्यात येते.