विराट कोहलीचे सोशल मीडियावर आवाहन
नवी दिल्ली : हिंदुस्थान व दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची मालिका कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर 'टीम इंडिया'चा कर्णधार विराट कोहलीनेही सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून जनतेला सुरक्षित आणि सावध राहण्याचे आवाहन केले आहे. स्वतःची संपूर्ण काळजी घेत मजबूतपणे कोरानो व्हायरसचा सामना करा. सुरक्षित रहा, सावध रहा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उपचारापेक्षा जास्तीत जास्त काळजी घ्या,' असे कोहलीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.