डेटा पॅकसाठी किमान दर निश्चित करा, कंपन्यांची सरकारकडे मागणी
मुंबई, - मोबाईल डेटासाठी यापुढे तुम्हाला ५ ते १० पटींनी अधिक पैसे मोजावे लागू शकतात. याचे कारण म्हणजे एअरटेल, जिओ, वोडाफोनसह अन्य मोबाईल कंपन्यांनी मोबाईल डेटाचे किमान दर ठरविण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला दिला आहेहा प्रस्ताव मंजूर झाल्यास डेटासाठी ग्राहकांना जादा पैसे मोजावे लागतील.
मोबाईल कंपन्यांच्या आपापसातील स्पर्धेमुळे ग्राहकांना सध्या १ जीबी फोर-जी डेटासाठी केवळ ३.५ रुपये मोजावे लागतात.
मात्र १ जीबी फोर-जी डेटासाठी किमान ३५ रुपये आकारले जावेत असा प्रस्ताव वोडाफोनने दिला आहे. एअरटेलने १ जीबीसाठी ३० रुपये तर जिओने २० रुपये आकारले जावेत असा प्रस्ताव दिला आहे. कॉल आणि डेटाचे प्लॅन मोबाईल कंपन्याच ठरवतात. परंतु आपापसातील स्पर्धेमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी कंपन्यांनी डेटासाठी किमान दर वार्ता ठरविण्यासाठी ट्रायला साकडे घातले आहे.