'अपूर्ण बांधकाम कंत्राटदार काळ्या यादीत'

मुंबई - व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत १७ सरकारी संस्थापैकी १२ औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तीन वसतिगृहे व दोन शासकीय तांत्रिक विद्यालये आहेत. यातील १२ संस्थांच्या इमारतींचे हस्तांतरण झाले आहे. उवरित औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची कामे अपूर्ण असून, त्यासंदर्भात तीन महिन्यांमध्ये चौकशी करून संबंधित कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकले जाणार असल्याची माहिती कौशल्य विकास व उद्योजकतामंत्री नवाब मलिक यांनी बुधवारी विधानसभेत दिलीराज्यात बांधकाम झालेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या इमारतींच्या अपूर्णावस्थेसंदर्भात आ. अमिन पटेल यांनी प्रश्न उपस्थित केला होता.