करोनाः सर्व निवडणुका ३ महिने पुढे ढकलल्या


 मुंबईः करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य दिलं जात असन. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आवश्यक खबरदारी आणि पावलं उचलत आहे. गर्दी टाळण्यासाठी काटेकोर प्रयत करण्यात यावेत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले. राज्यातील ग्रामीण भागातील सर्व शाळा बंद कराव्यात, असे निर्देश देतानाच, ग्रामपंचायत व नगरपालिकेच्या आगामी निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत, अशी । माहितीही त्यांनी दिली.


मंबईतील वर्षी निवासस्थानी सोमवारी मुख्यमत्रा उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. करोनाचा प्रादुर्भाव थांबविणे यास सर्वोच्च प्राधान्य असून राज्य शासनाने उचललेल्या पावलांमुळे अद्याप तरी राज्यात परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र गर्दी रोखण्यासाठी काटेकोर प्रयत्न करावेच लागतील. या दृष्टीने सर्व धमिऱ्यांच्या प्रार्थनास्थळांवर नियमित पूजा अर्चा सुरु ठेवून भाविकांची गर्दी मात्र थांबविण्याचे निर्देश ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले. साथरोग प्रतिबंध कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची असून, रोगाचे हे संकट टळल्यानंतर धार्मिक सण, उत्सव पूर्ववत: साजरे करता येतील. या क्षणी जनतेचे आरोग्य हे एकमेव प्राधान्य आहे. कोणत्याही पक्ष संघटनांचे राजकीय कार्यक्रम, समारंभ, मेळावे रोगाचा प्रादुर्भाव असल्यामुळे होऊच नयेत असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ____ मुख्यमंत्री म्हणाले, एखादी व्यक्ती करोनाग्रस्त असली तरी ती काही गुन्हेगार नाही. तिला योग्य औषधोपचार आणि मानसिक आधारही द्या. राज्यात लाग असलेला साथरोग प्रतिबंध कायदा जनतेच्या हितासाठी असून त्यांच्यात जागृती आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोहिमा हाती घ्याव्यात. नागरिकांमध्ये भीती आहे. जे रुग्ण पॉ झिटिव्ह आढळले त्यांच्यासाठी मानसिक आधार देण्याची आवश्यकता असून क्वॉरंटाईन केलेल्या ठिकाणी त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. राज्यात जे रुग्ण दाखल आहे त्यातील उपचाराला प्रतिसादही देत आहेत, असेही त्यांनी सांगितले. करोना रोखणारे क्वारंटाइन म्हणजे नेमके 


करोना रोखणारे क्वारंटाइन म्हणजे नेमके काय? 


नियम सर्वांना सारखे असून धार्मिक सण- उत्सव, समारंभांसोबतच राजकीय कार्यक्रमांनाही परवानगी देऊ नका, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. ज्या नागरिकांना होम क्वॉरंटाईन सांगितले आहे त्यांनी स्वत:हूनच घरी राहून स्वत:बरोबरच इतरांचीही काळजी घ्यावी. ग्रामीण भागातील शाळा बंद करतानाच सार्वजनिक स्वच्छतागृह या ठिकाणी सॅनिटायजर, साबण आणि पाणी उपलब्ध राहील यांची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. परदेशातील टुर्सना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. राज्य शासन करोनाचा प्रभाव रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करीत आहे. नागरिकांनी सर्तक रहावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. देशात करोनाचा फैलाव करोनाचा प्रार्दुभाव पसरु नये याकरिता : राज्यातील सर्व धार्मिक उत्सव रद्द करावेत. सर्व : धर्मीय प्रार्थनास्थळांमध्ये दैनंदिन पूजाअर्चा व धार्मिक विधी शिवाय भाविकांसाठी तेथे प्रवेशास काही दिवस प्रतिबंध करावा. व्यापक जनहित लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी कायद्याचा वापर प्रभावीपणे करावा. राज्यातील ग्रामीण भागातील सर्व शाळा बंद कराव्यात. ग्रामपंचायत व नगरपालिकेच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्यात आल्या आहे. करोनाच्या आपत्कालीन उपाययोजनांसाठी तातडीचा निधीचा पहिला हप्ता म्हणून ४५ कोटी रुपये विभागीय आयुक्तांना देण्यात येणार असून, ज्या प्रवाशांना घरी राहून क्वॉरंटाईन करण्याच्या सूचना दिल्या आहे , त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. यासर्व कारवाई करताना त्याला मानवी चेहरा असावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले. ग्रामीण भागातीलही शाळा बंद ठेवणार


ग्रामीण भागातीलही शाळा बंद ठेवणार 


करोनाच्या उपाययोजनांसाठी तातडीच्या निधीसाठी कोकण आणि पुणे विभागीय आयुक्तांना प्रत्येकी १५ आणि १० कोटी तर, नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक विभागीय आयुक्तांना प्रत्येक ५ कोटी रुपये असे ४५ कोटींचा पहिला हप्ता देणार


कोरोनाच्या नियंत्रणासाठी पोलिसांकडून '१४४'ची


मात्राकोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांनी ३१ मार्चपर्यंत शहरात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून खासगी टुर्सच्या आयोजनावर बंदी घातली आहे. या आदेशाचा भंग जे करतील, त्यांच्यावर फौजदारी दंड संहिता (सीआरपीसी) नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे मंबई पोलीस प्रवक्ते पोलीस उपायुक्त प्रणय अशोक यांनी सांगितले. सीआरपीसी कायद्याच्या कलम १४४ अन्वये एका ठिकाणी पाच किंवा त्याच्यापेक्षा अधिक लोक जमू शकत नाहीत. कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी त्या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहेत. हे प्रतिबंधात्मक आदेश फक्त कोरोना व्हायरस जास्त प्रमाणात पसरू नये, यासाठी बजावल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी कोरोनाबाबत घाबरून न जाता काळजी घेणे महत्त्वाचे आहे. शिवाय मास्कचा वापर करत गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असेही प्रणय अशोक यांनी नमूद केले.