कोटक बँकेच्या ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या इसमाला अटक


मुंबई - ओर्लेम चर्च समोरील कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएम मशीनमध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या सहाय्याने बँकेच्या ग्राहकांची फसवणूक करण्यात आली होती. याबाबत कोटक महिंद्रा बँकेच्या मॅनेजरने मालाड पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीवरून मालाड पोलिसानी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जॉर्ज फर्नाडिस यांच्या माग्दार्शनाखाली एका इसमाला अटक करण्यात आली. सदर प्रकरणाचा अधिक तपास पोनि दळवी, सपोनि तांबे करीत आहे तर आरोपीला पकडण्यासाठी पोलीस हवालदार कोंडे, पोलीस शिपाई मस्के व महिला पोलीस शिपाई गवळी यांनी सहभाग घेतला होता. 


२४ सप्टेंबर २०१९ रोजी २०.०० वाजताच्या दरम्यान ओर्लेम चर्च समोरील कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएम मशीनमध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या सहाय्याने बँकेच्या ग्राहकांची फसवणूक करण्याकरिता एका इसमाने डेबिट व क्रेडिट कार्डची माहिती संकलित करण्यासाठी मूळ एटीएम मशीन वर असलेल्या एटीएम मशीनला स्कीमर डिव्हाईस लावून फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. याबाबत कोटक महिंद्रा बँकेच्या मॅनेजरने दिनांक २७/०९/१९ रोजी मालाड पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान प्राप्त झालेल्या एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्ह्यातील आरोपीताचा शोध घेण्यात येत होता. तपासा दरम्यान सदर आरोपी इसमाच्या ठावठिकाण्याबाबत सपोनि तांबे व पथकास खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने सदर बाबत माननीय वपोनी सो यांना अवगत करून त्यांचे मार्गदर्शनाप्रमाणे बोरीवली परिसरात शोध घेऊन कोटक महिंद्रा बँकेचा एटीएम मध्ये स्कीमर डिव्हाईस व कॅ मेरा लावून फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या इसमास ताब्यात घेऊन त्यास अटक करण्यात आली असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे. या आरोपीविरुद्ध गु र क्र ४०५/१९ कलम ४१९,४२०,४६८,४७१,५११ भादविसह कलम ६६ क ड आयटी अॅक्ट २००० गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे.