अस्वाली धरणात तरुण बुडाला. ४८ तासांनंतर मृतदेह सापडला

डहाणू, - धुलिवंदनाच्या दिवशी अस्वाली धरणात पोहायला उतरलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. या तरुणाचा मृतदेह तब्बल ४८ तासांनंतर शोधपथकाला मिळाला. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. डहाणूच्या मसोली येथील शॉन आर्यन (२९) हा बोर्डीपासून सुमारे १० कि.मी. अंतरावर असलेल्या अस्वाली धरणावर चार मित्रांसोबत धुलिवंदनाच्या दिवशी फिरायला गेला होता. यावेळी शॉन पोहण्यासाठी धरणात उतरला. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. ४८ तासांनंतर मच्छीमार बांधवांनी शॉनचा मृतदेह पाण्याबाहेर काढला.