__ शनिवारी सकाळी गेटवे येथून अलिबागला निघालेली प्रवासी बोट मांडवा बंदराकडे येताना बुडाली. या बोटीत प्रवाशी होते. मांडवा पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे ८८ प्रवाशांचा जीव वाचला आहे. मांडवा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक प्रशांत घरत यांनी प्रसंगावधान राखत केलेल्या कामगिरीमुळे ८८ जणांचा जीव वाचला. प्रशांत घरत यांनी सद्गुरू कृपा बोटीतील दोन खलाश्यांच्या मदतीने त्वरित जाऊन बुडणाऱ्या प्रवाशांना वाचविले. त्यामुळे हे तिघे त्याच्यासाठी देवदूतच ठरले आहेत.
गेटवे येथून सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास अजंठा बोट ८८ प्रवाशांना घेऊन मांडवा बंदराकडे निघाली होती. मांडवा बंदराजवळ बोट आली असता अचानक बोटीत बिघाड होऊन पाणी घुसू लागलेत्यामुळे प्रवाशांमध्ये एकच घबराट उडाली.
प्रवासी जिवाच्या आकांताने ओरडू लागलेमांडवा पोलीस उपनिरीक्षक धर्मराज सोनके यांना माहिती मिळताच त्यांनी सद्गुरू कृपा बोटीसोबत पोलीस नाईक प्रशांत घरत यास तातडीने पाठवून दिले. बोटीच्या खलाशानी तातडीने जाऊन त्यांनी व प्रशांत घरत यांनी बुडणाऱ्या ८८ जणांचे प्राण वाचवून त्यांना सुखरूप मांडवा बंदरात सोडलेबोट पोहचण्यास वेळ झाला असता तर ८८ जणांना जलसमाधी मिळाली असतीमात्र बोटीचे खलाशी आणि पोलीस नाईक देवदूता सारखे पोहचल्याने प्रवाशांचे प्राण वाचले.
मांडवा पोलीस उपनिरीक्षक धर्मराज सोनके व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन सर्व प्रवाशांना मदत केली. तर बोट काढण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. अजंठा या बोटसेवा देणाऱ्या कंपनीवर पोलीस कारवाई करण्यात येणार असल्याचे धर्मराज सोनके यांनी सांगितले. अजंठा प्रशासन हे यांच्या बोटीची क्षमता ही ५० ते ६० प्रवाशांची असतानाही जास्त प्रवाशी नेहमी भरून आणत असतात. तर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हवी तशी सोय केलेली नसते अशी बोंब नेहमीच प्रवाशांकडून होत असते. मात्र याकडे दुर्लक्ष करून अजंठा प्रशासन प्रवाशांच्या जीवाशी खेळत असते. याकडे मेरिटाईम बोर्डही दुर्लक्ष करताना दिसत आहे.