बुलेट ट्रेनपेक्षा लोकलच्या विकासाकडे लक्ष द्या! शिवसेनेची मागणी


नवी दिल्ली,  – 'मुंबईकरांची जीवनवाहिनी' अशी मुंबई उपनगरीय रेल्वेची ओळख आहे. लाखो लोक त्यातून जीव मुठीत धरून प्रवास करतात. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनवर कोट्यवधी रुपये नाहक खर्च करण्यापेक्षा हा पैसा मुंबई लोकल्च्या विकासासाठी खर्च करा, अशी आग्रही मागणी शिवसेनेने आज  केली


___ पुरवणी मागण्यांवरील चर्चेत रेल्वे खात्यावर झालेल्या चर्चेत सहभागी होताना शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी मुंबईतील उपनगरीय रेल्वेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनची जनतेला गरज नाही, तर त्याऐवजी जीव मुठीत धरून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना दिलासा द्या, अशी मागणी त्यांनी केली. उपनगरीय रेल्वेत महिलांच्या डब्यात स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. देशात रेल्वेसेवा सुरू व्हावी यासाठी अमूल्य योगदान देणाऱ्या जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेठ यांचे नाव मुंबई सेंट्रल स्थानकाला देण्यात यावे, अशी मागणी अरविंद सावंत यांनी यावेळी केली.