मराठमोळ्या संस्कृतिचा मिसळ महोत्सव मिराभाईंदरमध्ये मोठ्या धुमधडाक्यात पार पडला


दि. १६.०२.२०२० मिरा भाईंदर येथे हिदुह्दयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे मैदानात मागील पाच वर्षे सतत मराठमोळी संस्कृति जोपासण्याचे कार्य कोल्हापूर मिसळ या माध्यमातून कार्यक्रम घेण्यात येतो . याचे मुख्य वैशिष्ठ म्हणजे सर्व इतरत्र विखुरले गेलेल्या मराठमोळया माणसांना एकत्रित करुन लोप पावत चाललेली आपली संस्कृतिचे प्रदर्शन येथे मोठया प्रमाणात मिराभाईंदरमध्ये मोठ्या धुमधडाक्यात साजरे केले जाते. यावेळी अनेक विविध क्षेत्रात कामगिरी बजावलेले महानूभव येथे कोल्हापूर मिसळ ला भेट देतात. तसेच सतत चार दिवस येथे लोकसंगीत लावणीचे कार्यक्रम सादर करण्यांत येतात. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी येथे आपली हजेरी लावतात. हजारोंच्या संख्येने येथे माणसांचा गाजावाजा असतो. मिसळ महोत्सवात अनेकप्रकारच्या मिसळ येथे चाखण्यासाठी माणसाची गर्दी असते. या कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक विजय पाटील अध्यक्ष सरदार आमते व सचिव रावसाहेब पाटील यांच्या सोबत सर्व मित्रमंडळीच्या वतीने करण्यांत येत. मान्यवराचे या कार्यक्रमात स्वागत मोठया प्रमाणत करण्यात येते.सर्व कार्यकर्ते आपल्या मावळयांच्या वेषभूषेत हजर असतात. असा हा मराठमोळा कार्य मिराभाईंदरमध्ये चार दिवस सतत साजरा करण्यात आला.