कोरोनामुळे कालावधी कमी केलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची शनिवारी सांगता झाली. पुढील पावसाळी अधिवेशन मुंबईत २२ जूनपासून सुरू होणार आहे, अशी घोषणा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. या अधिवेशनात एकूण ९२ तास २ मिनिटे कामकाज झाले. ४ तास २४ मिनिटे सभागृहाचे कामकाज होऊ शकले नाही. सभागृहाचे कामकाज सरासरी ६ तास ५८ मिनिटे झाले. सभागृहात सदस्यांची सरासरी उपस्थिती ही ८२ इतकी होती. एकूण १६ विधेयके अधिवेशनात मंजूर करण्यात आली असेही अध्यक्षांनी जाहीर केले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजले . २२ जूनपासून पावसाळी अधिवेशन