आश्रय ट्रस्टच्या वतीने पनवेल शहरात मोफत आरोग्य शिबिर संपन्न



दि.०१.०३.२०२० रोजी पनवेल येथील सेक्टर १२, खांदा राहूल कॉलनीमध्ये असलेल्या बालग्राम महाराष्ट्र या आश्रमात मोफत या आरोग्य शिबिर सोशल राईटस च्या पनवेल कमीटीचे अध्यक्ष राहूल लोहकरे व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित केले होते. या परिसरातील अतिशय गोरगरीब लोकांसाठी सदरचे शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात रक्ताचे नमुने घेऊन अठ्ठाविस प्रकारच्या चाचण्या मोफत करण्यांत आल्या. तसेच मोफत औषधे, इसीजी व फक्त शंभर रुपयांत चष्मा वाटप करण्यांत आले. आरोग्यांच्या बाबतीत संपूर्ण शरीर तपासणी व शस्त्रक्रिया यासाठी बरेच माणसे वंचित असल्यामूळे या शिबिरात मोठया संख्येने लोकांनी हजेरी लावली व शिबिराचा लाभ उठवला. या शिबिरात ज्या  रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज आहे त्यांच्यावर आश्रय ट्रस्ट च्या वतीने मोफत इलाज करण्यात येणार आहे. या शिबिरासाठी मनराज प्रतिष्ठान चे संस्थापक मनोज नाथानी व संस्कार सेवा संस्थाचे संस्थापक पिंकी पाटील स्वतः उपस्थित राहून यांनी मोलाचे सहकार्य केले . त्याचप्रमाणे अॅपेक्स हॉस्पिटलचे तज्ञ डॉक टर व स्पेक्ट्म लॅब चेमनीष कुमार त्यांचे सहकारी यांनी सहकार्य केले .या शिबिराच्या प्रमुख अतिथी पनवेल महानगर पालिकेच्या नगरसेविका विद्याताई गायकवाड, पनवेल पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरिक्षकअंकूशखेडेकर उपस्थित होते त्याचप्रमाणे पाहुणे कलाकार बबन विश्वकर्मा.खांदा कॉलीनी शिवसेना शहर अध्यक्ष सदानंद शिर्के, संजयलिला बालक्रिष्ण शिंदे उपस्थित होते.या शिबिराचे नियोजन निखिल गमरे, अविनाश गमरे, पटेल, श्रीनाथ ठाठोरे, गौरेश, रिशीकांत कदम, दिपक शर्मा, अनिकेत मोहीते, विनायकपाटील व भगत यांनी केले होते.