दरवाढ म्हणजे वीजचोरी व गळतीची ग्राहकांकडून वसुली

वसई : महावितरणने वीज आयोगाला सादर केलेल्या ६० हजार ३१३ कोटी रुपयांच्या वीज दरवाढीच्या प्रस्तावाला वसईतील जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी नवी मुंबई वीज आयोगाकडील सुनावणीवेळी जोरदार विरोध केला आहे. वीजचोरी, वीज गळती आणि भ्रष्टाचाराची वसुली या दरवाढीच्या माध्यमातून प्रामाणिक ग्राहकांकडून केली जात असल्याचा आरोपही या वेळी संघटनेकडून करण्यात आला. महावितरणने वीज आयोगाला सादर केलेल्या ६० हजार ३१३ कोटी रुपयांच्या वीज दरवाढीच्या प्रस्तावाला जनता दलाचे कुमार राऊत, जॉन परेरा, पायस मच्याडो आदींनी विरोध केला आहे. महावितरणचा वीज दरवाढीचा प्रस्ताव फेटाळून लावण्याची मागणी जनता दलाने आयोगाकडे केली आहे. महावितरणने पुढील पाच वर्षांत ६० हजार ३१३ कोटी रुपयांच्या वीज दरवाढीचा प्रस्ताव वीज आयोगापुढे सादर केला असता ही दरवाढ १ ते ५ टक्के इतकीच आहे, असा दावा जरी महावितरणने केला असला तरीही जनता दलाने आहे मात्र महावितरणचा हा दावा फसवा असल्याचा गंभीर आरोप केला आहे. सध्याचा सरासरी वीजदर प्रति युनिट सध्याचा सरासरी वीजदर प्रति युनिट जवळपास ६.५० रुपये इतका आहे, तर २०२०-२१ मधील हा दर ७.२५ रुपये प्रति युनिट म्हणजेच ७.५० टक्केपेक्षा अधिक दरवाढ आहे. हीच वाढ २०२४-२५ मध्ये प्रति युनिट ८.२५ म्हणजेच सध्याच्या दराच्या तुलनेत तब्बल २० टक्क्यांपेक्षा जास्त होणार आहे.