निर्भया प्रकरणातील चारही आरोपींना फाशी होणार हे निश्चित झालं होतं. कारण राष्ट्रपतींनी पवन कुमारची दया याचिका फेटाळली होती. पण दिल्ली कोर्टाने या फाशीला स्थगिती दिली आहे. त्यामुळे निर्भया प्रकरणातील चारही आरोपींना उद्या होणारी फाशी टळली आहे. आपल्याला फाशीऐवजी जन्मठेप देण्यात यावी अशी याचिका पवन कुमारने केली होती. ती कोर्टाने फेटाळल्यानंतर त्याने राष्ट्रपतींकडे दया याचना केली. मात्र ही याचिका फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे निर्भयाच्या आरोपींना फाशी होणारच हे निश्चित झालं होतं. मात्र दिल्ली कोटीचा निर्णय कोर्टाच्या निर्णयामुळे चारही दोषींची उद्या होणारी फाशी टळली आहे.
दिलीत २०१२ मध्ये मेडिकलला शिकणऱ्या एका महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. तिचा लैंगिक छळ करण्यात आला. तिला मारहाण करुन विवस्त्र अवस्थेत फेकनही देण्यात आले. १६ डिसेंबर २०१२ ला घडलेल्या या घटनेमुळे सगळा देश हादरला होता.