एकाच कुटुंबातील नवी मुंबई - तळोजा येथील फेज वनमधील सेक्टर ९ येथील एका सोसायटीत फ्लॅटमध्ये चौघांची मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये दोन मुलं आणि पती-पत्नीचा समावेश आहे. चारही मृतदेह कुजले आहेत. पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. सोसायटीत दुर्गधी न पसरल्याने ही घटना समजली नसल्याचे सोसायटीतील नागरिकांनी सांगितले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, नवी मुंबईतील तळोजा सेक्टर ९ मधील शिव कॉर्नर सोसायटीत ही घटना घडली आहे. नितेशकुमार उपाध्याय यांचे कुटुंब भाडेतत्वावर राहत होते. नितेशकुमार उपाध्याय यांनी पत्नी, मुलगी, मुलगा यांची हत्या करून स्वत: गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. चौघे मागील दोन महिन्यांपासून मृतावस्थे पडले असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. चौघांचे मृतदेह कुजले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.
नितेश कुमार उपाध्याय यांनी मागील २ महिन्यांपासून घराचे भाडे दिले नाही. फोन देखील उचलत नसल्याने घरमालक ज्यावेळी घरी आले त्यावेळी सदर धक्कादायक घटना समोर आली. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये ३५ वर्षीय व्यक्ती, ३० वर्षीय महिला, ७ मुलगी आणि ८ वर्षीय मुलगा असल्याचे स्पष्ट झाले आहे. पत्नी आणि मुलांना गळफास लावून त्यांची हत्या करण्यात आली असून नंतर नितेशकुमार यांनी आत्महत्या केली असावी, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सदर घटनेचा सर्व बाजने तपास करण्यात येईल. अशी प्रतिक्रिया उपायुक्त अशोक दधे यांनी दिला आहे.