माजी आमदार नरेंद्र मेहतांना कोणत्याही क्षणी अटक.  बलात्कार व अट्रोसिटीचा गुन्हा

भाईदर, - मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर बलात्काराबरोबर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. भाजपमधील एका पीडित महिलेच्या तक्रारीनंतर ठाणे ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी रात्री हा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी मेहता यांना अटक होऊ शकते. याप्रकरणी नरेंद्र मेहता यांचे अतिशय जवळचे सहकारी संजय थरथरे याच्यावरील दाखल झाला आहे. बलात्काराचा गुन्हा दाखल होताच आरोपी नरेंद्र मेहता गायब झाले आहेत. पीडितेने नगरसेविकेने दिलेल्या तक्रारीनुसार मेहता यांनी ओळख झाल्यावर फसवणूक करून . संबंध ठेवले. त्याला विरोध केला असता मेहता यांनी आपल्या ताकदीच्या जोरावर बळजबरी केली. त्यांच्या दहशतीमुळे गप्प राहावे लागल्याचे पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे. तसेच नरेंद्र मेहता यांनी माझ्याशी मंदिरात लग्न केले असून त्यांच्यापासून एक मुलगा असल्याचा दावाही पीडितेने केला आहे. दरम्यान याविरोधात तक्रार केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी देत मेहता यांनी अनेक वेळा जातीवाचक शिवीगाळही केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यांचा जवळचा सहकारी संजय थरथरेदेखील मला जीवे मारायची धमकी देत होता, असा आरोप पीडितेने तक्रारीत केला आहे.