राज्यात पट्रोल-डिझेल महागणार मुंबई, पुण्यात घरखरेदी स्वस्त

मुंबई : राज्यातील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाआघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज, राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला. या पहिल्या अर्थसंकल्पात राज्यातील जनतेला सुखावणारे काही निर्णय जाहीर करण्यात आले तर, काही निर्णयांवरून नाराजीही व्यक्त होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पातील घोषणेनुसार आता राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एक रुपयाने वाढ होणार आहे.


होणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार म्हणाले, 'जगभरात ग्लोबल वॉर्मिंगचे संकट गहीरं आहे. त्यासाठी झाडं लावण्याची गरज आहे. राज्यात अवकाळी पावसाचं संकट सातत्यानं डोकं वर काढत आहे. त्यामुळं सरकारनं पावलं उचलण्याचा निर्णय घेतलाय. राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलवर अतिरिक्त कर लावून त्यातून निधी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यातून उभा राहणारा निधी फक्त आणि फक्त पर्यावरणाच्या कामासाठीच वापरला जाणार आहे.' राज्य सराकारच्या या निर्णयामुळं पेट्रोलडिझेल प्रतिलिटर एक रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. बांधकाम व्यवसायाला सध्या मंदीचा फटका बसत आहे. विशेषतः मुंबई आणि पुण्यात मोठ्या प्रमाणावर तयार घरे पडून आहेत.