कोरोनामुळे नेमका कसा त्रास होतो?
कोरोना विषाणू अर्थात कोविड-१९ मध्ये आपल्या श्वासप्रणालीच्या खालील भागाला त्रास जाणवतो. त्यामुळे सुका खोकला येऊन श्वास घेताना अधिक अडचण उद्भवते. तसेच ताप १०५ डिग्रीपर्यंत असू शकतो. हा त्रास न्यूमोनिया किंवा कोरोनाचा असू शकतो.
सर्दी-पडसे आणि शीतज्वरामध्ये फरक काय?
सर्वसाधारण सर्दी-पडसे काही दिवसांतच बरे होते. आठवडाभरातच सर्व लक्षणे गायब होतात; परंतु शीतज्वरामध्ये (फ्लू) बरे होण्यासाठी अधिक वेळ लागतो. एक आठवडाभर तर संबंधित रुग्ण अंथरुणातून बाहेर पडू शकत नाही. पूर्ण लक्षणे गायब होण्यासाठी काही आठवडे लागतात.
कोरोनाचा फैलाव कसा होतो?
कोरोना विषाणू -शिंकताना आणि खोकताना तोंडातून बाहेर पडणाऱ्या थेंबांवाटे पसरतो. हा विषाणू कपडे आणि त्वचेवर वेगवेगळ्या कालावधीपर्यंत राहतो. हिंदुस्थानी विज्ञान संस्थानने युनिसेफच्या मदतीने एक विधान केले आहे. त्यानुसार कोरोना विषाणूच्या सेलची व्याप्ती ४०० ते ५०० मायक्रो इतकी असते. यावर उपाय म्हणून गरम पाण्यात मीठ टाकून गुळण्या मारणे फायदेशीर आहे.
खबरदारी काय बाळगायची?
जेव्हा कोणत्याही धातूच्या - पृष्ठभागावर हा विषाणू पडतो, तेव्हा तो १२ तासांपर्यंत जिवंत राहतो. यासाठी वेळोवेळी हात साबणाने धुण्याचा सल्ला दिला जात आहे.
कपड्यावर पडणारा विषाणू साधारणत: ९ तासांपर्यंत सक्रिय राहतो. त्यामुळे रोज धुतलेले कपडे परिधान करणे तसेच सूर्यकिरणांमध्ये उभे राहणे गरजेचे आहे.
आपल्या हातावर जवळपास १० मिनिटांपर्यंत विषाणू राहतो. त्यामुळे आपल्याजवळ नेहमी अल्कोहोल सॅनिटायझर ठेवा आणि गरम पाणी पित राहा. थंड पदार्थ आणि आईस्क्रीम खाणे टाळा.