वसई : पोलिसांच्या विशेष पथकाने विरारमधून पकडलेल्या बांगलादेशी नागरिकांकडे अर्नाळा ग्रामपंचायतीचे जन्मदाखले सापडल्याने येथील कोळीवाडा, वाल्मीकी नगर व टाकीपाड्यात वास्तव्यास असणाला परप्रांतीयांकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. दुसरीकडे, नालासोपालाच्या पश्चिमेकडील टाकीपाडा परिसरासाठी पोलीस चौकीच्या उभारणीची आवश्यकता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखा आणि दहशतवादविरोधी पथकाने संयुक्त कारवाई करून वसई-विरारमध्ये बेकायदा वास्तव्य करणाला बांगलादेशींची धरपकड केली. या बांगलादेशींकडे अर्नाळा ग्रामपंचायतीचे जन्मदाखले आढळून आल्यामुळे बांगलादेशींना बेकायदा साहाय्य करणारे स्थानिक पातळीवरचे अधिकारी तथा कर्मचालांविरुद्धही कारवाई करण्याची मागणीही जोर धरत आहे.
नालासोपालाच्या पश्चिमेकडीलनालासोपालाच्या पश्चिमेकडील गास परिसरातील टाकीपाडा भागात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय राहतात. यामध्ये अनेक जण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून काही तडीपार व्यक्तींचाही या भागात वावर असल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून होत आहेत. या भागात गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत. चोरी, अमली पदार्थाचे बेकायदा सेवन, दादागिरी आदी प्रकार येथे वाढले असून मध्यंतरी बॉम्बस्फोटातील आरोपींना या भागातून अटक करण्यात आली होती. या परिसरात पोलीस चौकी उभारण्याचे आदेश राज्याच्या साहाय्यक महासंचालकांनी मार्च २०१७ मध्ये निगमित केलेले आहेत. मात्र अडीच वर्षे उलटूनही पोलीस चौकी निर्मितीच्या दिशेने काहीही प्रयत्न झाले नसल्याचे येथील जॉय फरगोज यांनी सांगितले.
वाल्मिकीनगरात गुन्हेगारांचे तळ ।
वसई कोळीवाड्यानजीक असलेल्या वाल्मीकी नगरातही बेकायदा वस्ती वाढत आहे. या ठिकाणी कोण कुठून वास्तव्यास येत आहे याची कुठेही नोंद किंवा कल्पना नाही. येथे अनेक गुन्हेगार व बांगलादेशींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. यातील अनेक जण अमली पदार्थाच्या व्यवहारात गुंतल्याचे सांगण्यात येते. वसई पोलिसांच्या धाडी या भागात पडत असल्या तरी संबंधितांकडे वास्तव्याचे दाखले तसेच रेशनकार्डही आढळून येत असल्यामुळे पोलीस पुढे कारवाई करीत नाहीत. त्यामुळे आता या भागातील परप्रांतीयांकडे आढळणाला कागदपत्रांची शहानिशा करण्याची गरज विशाल पाटील यांनी व्यक्त केली आहे.