राज ठाकरे करणार भाजपाशी युती? आशिष शेलार यांच्या भेटीने पुन्हा चर्चाना उधाण

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मनसे आणि भाजपातील जवळीक वाढू लागली आहे. आता हे दोन्ही पक्ष एकत्र येणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्यात रविवारी पुन्हा एकदा भर पडली. भाजपाचे भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी आज पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. तासभर चाललेल्या या चर्चेनंतर मनसेभाजपा युतीची पुन्हा नव्याने चर्चा सुरू झाली आहे.


राज्यात सध्या काँग्रेसराष्ट्रवादी आणि शिवसेना एकाबाजूला तर, भाजपा-मनसे एकाबाजूला असे चित्र आहे. भाजपा आणि मनसेमध्ये अधिकृत आघाडी नसली तरी, दोन्ही पक्षांमध्ये राजकीय जवळीक मात्र वाढत चालल्याचे बोलले जाते. राज ठाकरे यांनी धरलेली हिंदुत्वाची कास आणि मध्यंतरी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेली चर्चा यातून राज ठाकरेंचा मनसे पक्ष भाजपाच्या मैत्रीकडे झुकत असल्याच्या चर्चा आहेत.