दोन्ही केमिस्ट फरार
__याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले तिरुमला डेअरीचा केमिस्ट गोरख धांडे व दुसऱ्या डेअरीतील केमिस्ट साळुके हे दोघे अद्याप फरार असल्याची माहिती करकंब पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पाटील यांनी दिली. अन्न व औषध प्रशासनाकडे आलेला अहवाल प्राप्त झाल्यानंतर आरोपींविरुद्ध कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यातील केमिस्ट साळुके हा प्रतिलिटर एक रुपया कमिशन घेऊन दूध स्वीकारत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
सोलापूर : अन्न व औषध प्रशासनाने पंढरपूर तालुक्यातील सुगाव भोसे येथील श्रीराम दूध केंद्रावर छापा मारून जप्त केलेल्या दुधाच्या नमुन्यात मेलामाईन असल्याचा प्रयोगशाळेने अहवाल दिला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त प्रदीप राऊत यांनी दिली.
अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने १० जानेवारी रोजी सुगाव येथील श्रीराम दूध केंद्रावर छापा मारून रसायनाद्वारे तयार केलेले ६३८ लिटर कृत्रिम दूध व असे दूध तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या रसायनयुक्तपावडरीचा २७१९ किलो साठा जप्त करण्यात केला होता.
जप्त केलेल्या साठ्यात एक मेलामाईनची पिशवी आढळली होती. यावरून डेअरी मालक डॉ. दत्तात्रय जाधव व त्याचा नोकर गणेश गवळी यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम १८८,२७२,२७३,३२८ व अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ५९ अंतर्गत पंढरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
डॉ. जाधव याने भेसळयुक्त दूध तयार करण्यासाठी डेअरीमध्ये आणून ठेवलेला व कायद्याने बंदी असलेल्या मेलामाईन या पदार्थाचा ५० किलोचा (किंमत : १० हजार २०० रु.) वापर केल्याचे आढळले होते. त्याचबरोबर २९८ किलो दूध पावडर (३५ हजार ७६० रु.), १२४९ किलो व्हे. परमीट पावडर (१ लाख ९ हजार ९१२ रु.), ८२४ किलो लॅक्टोज पावडर (९८ हजार ८८० रु.), २९८ किलो पॅ राफिन (१४ हजार ९०० रु.) असे ४ लाख २ हजार १२ रुपये किमतीचे भेसळीसाठी लागणारे रसायन सापडले होते. हा साठा जप्त करण्यात आला तर तसेच भेसळीने तयार केलेल्या दुधाचे नमुने घेऊन हे दूध जागेवर ओतून देण्यात आले होते.
दुधाचे नमुने मुंबईतील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवून देण्यात आले होते. प्रयोगशाळेने मेलामाईनबाबत पाँ झीटिव्ह अहवाल दिला आहे. भेसळयुक्त दुधात मेलामाईन व स्वॉरबीटॉल, पॅरॉफिन, मिल्क पावडर असल्याचे नमूद केले आहे, असे राऊत यांनी सांगितले.