मंबई-ठाण्याच्या धर्तीवर वसई-विरार परिवहन सेवेला बळकटी द्या! शिवसेनेची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

ठाणे.  मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदरनंतर झपाटयाने वसई-विरार शहराचे नागरीकरण होत असताना पालिकेची परि सेवा दिवसेंदिवस ढेपाळत चालली आहे. अपुऱ्या आणि भंगार बसेमार येथील रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, पण ठेकेटोग दिसाळ कारभारामुळे परिवहन कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ ओदावली आहे. या मनमानीला राज्य परिवहन विभागाने चाप लावून मुंबई, ठाण्याच्या धतींवर वसई-विरार परिवहन सेवेला बळकटी द्यावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. या आशयाचे निवेदनच परिवहन मंत्र्यांना पत्राद्वारे देण्यात आले आहे. .


वसई-विरार महापालिकेची परिवहन सेवा सुरू झाल्या दिवसापासून वादात आहे. धूर ओकणाऱ्या प्रदूषणकारी व सामान्य नागरिकांच्या जीव घेणाऱ्या बसेस, ठेकेदाराच्या मनमानीमुळे वाहतूक विभागाच्या परवानगीशिवाय चालणाऱ्या बसेस, कर्मचाऱ्यांची देणी न देणे, पगार वेळेवर न देणे यामुळे सतत वादात असणारी परिवहन सेवा मागील दोन महिन्यांपासून तिसऱ्यांदा बंद पडली. याकडे लक्ष वेधण्यासाठी आमदार रवींद्र फाटक यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांना निवेदन दिले आहे. यामध्ये त्यांनी वसई-विरार महापालिकेने शहरात बससेवा सुरू करण्यासाठी ठेका दिलेल्या भागिरथी ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या मनमानी कारभाराचा पाढाच वाचला आहे. ठेकेदार मनोहर सकपाळ यांच्या मनमानीमुळे कर्मचारी अचानक कामबंद आंदोलन पुकारत असल्याने त्याचा नाहक त्रास वसई-विरार शहरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे मुंबई, ठाण्याच्या धर्तीवर वसई-विरार परिवहन सेवेची जबाबदारी घेऊन समस्या सोडविण्याची विनंती आमदार फाटक यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडे केली आहे.