मुंबई, : महाराष्ट्र दूध वितरक सेनेच्या पाठपुराव्यामुळे आरे दूध विक्रेत्यांना प्रतिलिटर ४.५० रुपये कमिशन मिळणार आहे. महाराष्ट्र दूध वितरक सेना आणि दुग्धव्यवसाय विकासमंत्री सुनील केदार यांच्यासोबतच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी विक्रेत्यांना प्रतिलिटर ३ रुपये कमिशन होते
__ महाराष्ट्र दूध वितरक सेनेचे प्रमुख सल्लागार आणि शिवसेना सचिवखासदार अनिल देसाई यांच्या सहकार्याने आरे वितरकांच्या प्रमुख मागण्यांबाबत नुकतीच मंत्रालयात दुग्धव्यवसाय विकासमंत्र्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीला आमदार रवींद्र वायकर, महाराष्ट्र दूध वितरक सेनेचे कार्याध्यक्ष राम कदमआदिनाथ हिरवे, सुहास शिवडवकर विलास भुजबळ, सतीश सावंत, प्रसाद नार्वेकर, अरविंद दळवी, शशी कुंभारराय, रेखा संखे, मानसी पोवळे आदी उपस्थित होते. आरे दूध केंद्राचे भुईभाडे पालिकेच्या २००९ च्या परिपत्रकानुसार आकारावे, स्टॉलधारकाचे वय ६० वर्षे झाल्यास अथवा स्टॉलधारक आजारपणामुळे स्टॉल चालविण्यास सक्षम नसेल तर त्याच्या संमतीने वारसाच्या नावावर स्टॉल हस्तांतरणास परवानगी देण्यात आली. तसेच आरेच्या सह उत्पादन विक्रीवरील रॉयल्टी देण्यास स्टॉलधारक तयार आहेत. यामुळे शासनालादेखील महसूल मिळेल याकडे वितरक सेनेने लक्ष वेधले.