कोकणात ग्रीनफिल्ड महामार्ग

 मुंबई, - मुंबईला नागपूरबरोबर जोडणाऱ्या बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर उरणमधील चिर्ले ते सिंधुदुर्गातील पत्रादेवी असा५०० किलोमीटर लांबीचा ग्रीनफिल्ड महामार्ग कोकणच्या किनारपट्टीवर बांधण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. शिवडी ते न्हावा शेवा बंदर ज्या भागात संपते त्या परिसरातील चिर्ले गावापासून महाराष्ट्र-गोवा सीमेवरील पत्रादेवीपर्यंत सुमारे ५०० किलोमीटर लांबीचा हा महामार्ग असेल. या मार्गाची आखणी कोकणपट्टीच्या किनाऱ्याजवळून करण्यात येणार आहे.