शिवसेना महापालिकेत एक नंबरला राहिला पाहिजे, तो आपला मित्र पक्ष आहे - अजित पवार


मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मिशन २०२२ हाती घेतलं आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आतापासूनच तयारीला लागली आहे. मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीचे नगरसेवक ८ वरुन ६० झाले पाहिजेत, अशा सूचना अजित पवारांनी केल्या आहेत. मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चुनाभट्टीतील सोमय्या मैदानावर आज दिवसभर कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या एकदिवसीय शिबिरात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार देखील मार्गदर्शन करणार आहेत. मिशन २०२२ हे शिवसेना-काँग्रेसला मिशन २०२२ हे शिवसेना-काँग्रेसला धक्का देण्यासाठी आहे, हा चुकीचा प्रचार केला जात आहे. विरोधी पक्ष आपली महाविकास आघाडी तोडण्याचा प्रयत्न करत आहे. पण ही 'दिवार तुटती क्यू नहीं' असं विरोधकांना वाटलं पाहिजे. आपल्याला एकमेकांबद्दल विश्वास वाटला पाहिजे. शिवसेना महापालिकेत एक नंबरला राहिला पाहिजे, तो आपला मित्र पक्ष आहे. मात्र राष्ट्रवादी दोन क्रमांकाचा पक्ष झाला पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.