बळीराजा सुखावला कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर

   


३४ लाख शेतकलांना मिळणार लाभ


 'महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती २०१९ योजनेंतर्गत आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील शेतकलांना दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येत आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात १५ हजार ३५८ शेतकलांच्या कर्जखात्याची पहिली यादी घोषित करण्यात आली होती. शेतकलांची कर्ज खाती आधार कार्डशी जोडून त्यात कर्जमाफीचे पैसे जमा करण्यात येत आहेत. राज्यातील सुमारे ३४ लाख शेतकलांना कर्जमुक्तीचा लाभ देताना त्यांना हेलपाटे मारायला लागू नयेत, तसेच कर्जमाफी योजनेत अचूकता यावी, हा टप्प्याटप्प्याने याद्या जाहीर करण्यामागील उद्देश आहे, असे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधान परिषदेत सांगितले होते. 'पहिल्या यादीमध्ये अद्याप तरी त्रुटी असल्याचे निदर्शनास आलेले नाही', असेही त्यांनी नमूद केले होते.


मुंबईः कर्जाच्या | ओझ्याखाली दबलेल्या शेतकलांवरील भार हलका करण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील असून महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी शनिवारी जाहीर करण्यात आली आहे.


 या यादीत नगर जिल्ह्यातील २ लाख ५२ हजार शेतकलांचा समावेश असून ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झालेल्या दोन गावांतील शेतकलांना तूर्त कर्जमाफी योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही. बाबुडी घुमट व विळद अशी या दोन गावांची नावे आहेत.


वर्धा जिल्ह्यातील ४६ हजार ४२४ शेतकलांचा दुसला यादीत समावेश आहे. वर्धा जिल्हा प्रशासनाकडून आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. वर्ध्यातील पहिल्या यादीत दोन गावांतील १६६ शेतकलांना कर्जमाफी मिळाली होती. त्यातील १५४ शेतकलांच्या खात्यात आतापर्यंत पैसे जमा झाले आहेत. दुसला यादीत कोल्हापूर जिल्ह्यातील ४२ हजार ९१३ शेतकलांचा समावेश असून पुढील प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली आहे.