सायना नेहवाल सलामीलाच गारद

लंडन : हिंदुस्थानची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिच्या टोकियो ऑलिम्पिक पात्रतेच्या अपेक्षांना मोठा धक्का बसलाय. ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप बॅडमिंटन स्पर्धेत ती सलामीलाच गारद झाली. सायनाला जपानच्या अकाने यामागुची हिने पराभवाचा धक्का दिला. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या यामागुचीपुढे सायना २८ मिनिटांत ११-२१, ८-२१ अशी पराभूत झाली. सायनाचा या जपानी प्रतिस्पर्धीपुढे ११ लढतींतील नववा पराभव होय.