हरविलेल्या, अपहरण केलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी १ ते ३१ मार्च दरम्यान “ऑपरेशन मस्कान-८” ही विशेष मोहीम संपूर्ण महाराष्ट्रात सुरु करण्यात आलेली आहे. सदर "ऑपरेशन मस्कान-८' विशेष मोहीम पालघर जिल्ह्यात देखिल सुरु करण्यात आली असून जिल्ह्यातील २३ पोलिस ठाण्यांमध्ये प्रत्येकी एक पोलीस पथक नेमण्यात आले असून सदर पथकात १ अधिकारी व ३ कर्मचारी यांचा समावेश आहे. या मोहीमेची योग्यरित्या अंमलबजावणी करण्यासंदर्भात शनिवारी गौरव सिंग पोलीस अधिक्षक पालघर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक्षक कार्यालय पालघर येथे बैठक घेऊन सदर बठकीत अपर पोलीस अधिक्षक पालघर विक्रांत देशमुख, स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस उपनिरिक्षक सुभाष बन, महिला पोलीस उपनिरिक्षक रेखा पाटील तसेच महिला सहाय्यक कक्षाचे महिला कर्मचारी यांनी सर्व पोलीस ठाण्यात नेमण्यात आलेल्या “ऑपरेशन मुस्कान-८” ऑ परेशन पथकातील अधिकारी/कर्मचारी यांना मोहिमेबाबत योग्य ते मार्गदर्शन व सुचना देण्यात आल्या आहेत.
"ऑपरेशन मुस्कान-८” ही मोहीम स्थानिक गुन्हे शाखा पालघर व अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष यांच्याशी समन्वय करुन पालघर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. सदर मोहिमे अंतर्गत पालघर जिल्ह्यातील रेकॉर्डवरील व रेकॉर्ड व्यतीरीक्त बेवारस बालकांचा जास्तीत जास्त शोध घेऊन ही मोहीम यशस्वीरित्या पार पाडण्याचा प्रयत्न करणार आहेत.