। गोरेगाव (पूर्व) येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत अनधिकृत सेट उभारल्यामुळे महामंडळाचे प्रतिदिन ४० हजार रुपये याप्रमाणे दोन ते तीन कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी आज विधानसभेत लेखी उत्तरात दिली. दादासाहेब फाळके चित्रनगरीतील बेकायदा सेट आणि महामंडळाच्या आर्थिक नुकसानीबाबत आमदार सुनील प्रभू यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. चित्रनगरीने केलेल्या बांधकामावर पालिकेने हरकत घेतल्याने चित्रीकरणासाठी उभारण्यात येणारे पोलीस ठाण्याचे काम बंद करण्यात आले त्यामुळे हे स्थळ चित्रीकरणासाठी उपलब्ध होऊ शकले नाही. पण सरकारच्या उत्पन्नात वाढ होऊन चित्रपट निर्मिती संस्थांना आवश्यकतेनुसार नव्याने चित्रीकरण स्थळे उपलब्ध करून देण्याच्या चांगल्या हेतूने हे काम केल्यामुळे महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली नाही असेही लेखी उत्तरात स्पष्ट करण्यात आले आहे.
अनधिकृत सेटसच्या बांधकामामुळे चित्रनगरीचे दोन ते तीन कोटींचे नुकसान