डहाणू - कोरोनाच्या धास्तीने उबवलेली नऊ लाख अंडी आणि दोन लाख नवजात पिल्ले खड्डा खोदून गाडणे डहाणूतील पोल्ट्री व्यावसायिकाच्या अंगलट आले आहे. संदीप भाटलेकर असे या पोल्ट्री व्यावसायिकाचे नाव असून सोशल मीडियावर त्याने आपल्या कृत्याचे समर्थन करणारे व्हिडीओही व्हायरल केले होते. ही बाब जिल्हा प्रशासनाच्या समोर आल्यावर संदीप भाटलेकर यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्या या वृत्याने पोल्ट्री व्यावसायिकांमध्ये चुकीचा संदेश गेला असून दहशत पसरली असल्याचे म्हटले आहे. तसेच कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
पिल्लांना जिवंत गाडणे अंगाशी