संपूर्ण देशभरात मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन टाळण्यात येत आहे. देशातील सर्व विमानतळ, बंदरे आणि शेजारील देशांच्या सीमेला लागून असलेल्या परिसरात स्क्रिनिंग सुविधेचा विस्तार करण्यात आला आहे. दिल्ली सरकारने आपल्या कार्यालयांत बायोमेट्रिक हजेरी तात्पुरती थांबवली आहे.
• उत्तर प्रदेश सरकारने कोरोनावर उपाययोजना आखण्यासाठी आरोग्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली १८ सदस्यीय समिती स्थापन केली आहे. तसेच कोरोनाग्रस्त १२ देशांतून येणाऱ्या १३७ संशयितांचे नमुने तपासणीसाठी वेगवेगळ्या प्रयोगशाळांमध्ये पाठवले आहेत.
गुजरातमध्ये इराणहून परतलेल्या ८७ लोकांसह इतर संशयितांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
मथुरा येथील इस्कॉन मंदिरच्या व्यवस्थापनाने परदेशातील भक्तांना पुढील दोन महिने दर्शनासाठी न येण्याचे आवाहन केले आहे.
रेल्वे मंत्रालयानेसुद्धा अॅलर्ट जारी केला असून कोरोनाग्रस्तांवरील उपचारासाठी स्वतंत्र कक्ष बनवण्याचे निर्देश दिले आहेत.