मुंबईः मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून प्रवास करणालांच्या खिशाला आता चाट बसणार आहे. १ एप्रिलपासून एक्स्प्रेस वेवरील टोल दरात वाढ होणार असल्याची घोषणा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं केली आहे. महामंडळानं नव्या कंत्राटदाराची नेमणूक केली आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कारसाठी सध्या २३० रुपये टोल आकारला जात आहे. तो १ एप्रिलपासून २७० रुपये आकारला जाणार आहे. ट्रक आणि अवजड वाहनांसाठी ४९३ रुपये टोल आकारला जात असून, नव्या दरानुसार ५८० रुपये आकारण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्सकडून एमआरडीसीला ८, २६२ कोटी रुपये अदा केले जाणार आहेत. उवरित रक्कम हप्त्यानं दिली जाणार आहे. त्याबदल्यात पुढील १५ वर्षे टोल वसुली करण्याचे अधिकार 'आयआरबी'ला असणार आहेत.
दरम्यान, १ एप्रिल २०२० पासून मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील टोल दरामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. त्यानुसार एसटी बसला एका फेरीसाठी (१२२ रुपये जाताना, १२२ रुपये येताना) २४४ रुपये जादा मोजावे लागतील. परंतु यामुळे तिकीट दरावर कोणताही परिणाम होणार नाही. तिकीट वाढणार नाही, असं एसटी महामंडळाकडून सांगण्यात आलं.