हेडफोन लातून रिक्षा चालवणाऱ्या रिक्षाचालकांचे हेडफोन जाळले . मिरारोड वाहतुक पोलिसांची धडक कारवाई


मिरा रोड रेल्वे स्टेशनच्या हद्दीत वाहतुक विभागाने अतिशय चांगली कामगिरी केली. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. पोलीसांनी हेडफोन लावून सतत बोलणाऱ्या चालकांवर कारवाई करुन ४०० ते ५०० हेडफोन भर रस्त्यात जाळून टाकले. वाहन चालवताना मोबाईल फोनवर बोलताना आढळल्यास पोलीस कारवाई करतात त्यामुळे वाहनचालक व प्रवासी यांच्यामध्ये वाद होत होते. रिक्षाचालक नेहमी हेडफोन लावून कोणाशी तरी बोलत असतात त्यामुळे प्रवाशाला कुठे उतरायचे आहे याकडे दुलर्भ करुन भलत्याच ठिकाणी घेऊन जातात. व यामुळे प्रवाशाची गैरसोय होते. यासाठी बऱ्याच प्रवाशांनी यासंदर्भात वाहतुक पोलिसांकडे तक्रार केली होती.शेवटी मिरारोड पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार कोळकर यांनी जितके रिक्षाचालककानात हेडफोन लावून बोलत होते त्यांचे हेडफोन जप्त करुन भरचौकात जाळून टाकले. अशा या कृत्याला नागरिकांचे मोठया प्रमाणावर समर्थन मिळत आहे.