नवी दिल्ली, - कोरोनाच्या धामधुमीत केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना खुशखबर दिली. शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४ टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. याचा फायदा ४८ लाख विद्यमान कर्मचारी तसेच ६५ लाख निवृत्तीवेतनधारकांना होणार आहे. या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवर १४,५९५ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार येणार आहे.
___मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकारांना दिली. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ करण्यात आली असून तो १ जानेवारीपासून लागू होणार असल्याचे ते म्हणाले. सध्या महागाई भत्ता १७ टक्के असून या निर्णयामुळे तो २१ टक्क्यांवर जाणार आहे. गेल्या वर्षीही सरकारने महागाई भत्ता पाच टक्क्यांनी वाढवला होता.